वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे आपल्याला काळजी घेणे आणि जागृत राहणे गरजेचे झाले आहे. हे खूप सोपं असतं म्हणायला की, Its very easy to say it isn’t dangerous की हे इतकं भयानक नाही!
तर अश्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की, जरा डोळे उघडा आणि इटली,चीन अश्या देशांकडे बघा दिवसाला ५०० हुन अधिक बळी कोरोना या विषाणू मुळे जाताय. इटली हा देश ज्याचा आरोग्य सेवा प्रदान करण्यात २ रा नंबर लागतो त्या देशाने ह्या कोरोना विषाणू पुढे गुडघे टेकले. तर आपला देश आरोग्य सेवा प्रदान करण्यात १०२ नंबरला आहे तर आपल्या भारत देशाची काय अवस्था होऊ शकते याचा अंदाज तुम्ही बांधू शकतातच.इटली ह्या देशाची लोकसंख्या जवळपास 10 करोड इतकी आहे आपल्या देशाहून कित्येक पटीने कमी असलेल्या लोकसंख्येच्या देशात मृत्यूचा तांडव होतोय त्यांना मृतदेहांचा अंत्यसंस्कार करायला जागा कमी पडतेय तर आपला देश ज्याची लोकसंख्या जवळपास 145 करोड इतकी आहे जर आपण आता काळजी घेतली नाही आणि मोकाट पणे बाहेर फिरलो तर भारताचं इटली होण्यास काहीच वेळ लागणार नाही. जी चूक इटलीने केली ती आपण करू नये असं थोडं ही मनातून वाटत असेल आणि आपल्याला ह्या विषाणूपासून दूर ठेवायचं असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळा आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासनाने लोकडाऊन चा निर्णय घेतला.तो निर्णय आपल्याच हितासाठी घेतलेला आहे.प्रशासनाला सहकार्य करण्याच सोडून जनता मोकाटपणे बाहेर फिरतेय खास करून तरुणवर्ग. अरे तरुणांनो तुम्ही तुमच्या देशाची काळजी घेतली नाही तर कोण घेईल? तरुणांनो तुम्ही तुमची जबाबदारी ओळखा आणि सहकार्य करा पुढील काही दिवस जितकं घरी राहता येईल तितकं घरी रहा.
अरे तुम्ही काय अमृत पिऊन आलेले नाही तुम्हाला अस वाटत की हा कोरोना माझं काही वाकड करू शकत नाही, मला तो होणार नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे तो डोक्यातून काढून टाका आणि वास्तविकतेला स्विकारा. आपलं भारत प्रशासन आणि वैद्यकीय सेवा विभाग जे काही अथक परीश्रम घेताय आणि परिस्थिती सुधरवू पहाताय. त्यांची आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे तर आपण आपल्या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना सहकार्य केलेच पाहिजे आणि त्यांनी फक्त आव्हाहन केलेय की, “तुम्ही तुमच्या घरात बसून सहकार्य करा आणि अत्यावश्यक असल्यास बाहेर पडा”.
जर ते तिथे आपल्यासाठी झटत आहे तर आपण सुद्धा आपल्या देशाला या कोरोना विषाणुमुळे होणाऱ्या महामारी पासून वाचवण्यास आपल्या सरकारला मदत करूया. स्वतः वचन घेऊया की, “हा देश माझा आहे आणि मी माझ्या देशाला ह्या विषाणुपासून दूर ठेवण्यात सरकारला घरी राहून मदत करेल “.
घाबरू नका पण जागृत रहा🙏🙏🙏
Best ahe
LikeLike
Good content
LikeLike
Rest in Home…
LikeLike
Good job bro….
LikeLike
In today’s time this information was very much needed….I am proud of you…
LikeLike
Right
LikeLike
Stay home Saty safe….
LikeLike